अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ झाली. हिरवी मिरची, काकडी, टोमॅटो, कोबी, वाटाणा व दुधीभोपळ्याची मोठी आवक झाली. भेंडी, आले, चवळी, शेवगा, गवार यांचे भाव घसरले. पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ५ कोटी ७० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक १ हजार क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव १,००० ते २,६०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या चार आठवड्यांपासून बटाट्याचा कमालभाव १,५०० रुपयांवरच स्थिरावला आहे. लसणाची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. लसणाला १५ हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २९० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार ५०० रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे- कांदा- एकूण आवक- १,००० क्विंटल. भाव क्रमांक- १. २,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,८०० रुपये, भाव क्रमांक ३. १,०००. बटाटा- एकूण आवक- १,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
फळभाज्या-फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे- टोमॅटो- २७८ क्विंटल (१,५०० ते २,५००), कोबी- १८० क्विंटल (१,४०० ते २,०००), फ्लॉवर- १७० क्विंटल (१,५०० ते २,२००), वांगी- ८६ क्विंटल (१,००० ते २,०००), भेंडी- ६२ क्विंटल (३,००० ते ४,०००), दोडका- ५६ क्विंटल (२,५०० ते ४,५००), कारली- ६४ क्विंटल ( ३,००० ते ४,०००), दुधीभोपळा- ५६ क्विंटल (१,००० ते १,८००), काकडी- ११५ क्विंटल (१,००० ते २,०००), फरशी- १२ क्विंटल (६,००० ते ८,०००), वालवड- ८ क्विंटल (६,००० ते ७,०००), ढोबळी मिरची- १३२ क्विंटल (२,५०० ते ५,०००), चवळी- ३० क्विंटल (२,००० ते ३,०००), वाटाणा- ५ क्विंटल (१३,००० ते १५,०००), शेवगा- ३५ क्विंटल (३,००० ते ५,०००), गाजर- १४५ क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार- ६८ क्विंटल (३,००० ते ५,०००), आले- १३५ क्विंटल (७,००० ते १२,०००).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे-मेथी- एकूण ६ हजार ४४५ जुड्या (१,५०० ते २,००० रुपये ),
कोथिंबीर : एकूण १७ हजार १९० जुड्या (१,५०० ते २,३०० रुपये), शेपू- एकूण ३ हजार १८५ जुड्या (१,४०० ते १,८०० रुपये), पालक- एकूण ३ हजार ८४७ जुड्या (४०० ते ७०० रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्सी गायींपैकी ३० गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये), ५५ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), १०५ म्हशीं पैकी ८५ म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), ९,६०० शेळ्या-मेंढ्यापैकी ९,४०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.