Result Pudhari
पुणे

Pune CBSE 10th Result: पुण्यात CBSE दहावीचा 100% निकाल; विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शहराचा लौकिक वाढवला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात शहरातील शाळांनी दमदार कामगिरी केली. बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यश संपादन केले.

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील सर्व 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा सरासरी निकाल 90.5 टक्के लागला. अथर्व भिडे याने 98 टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला. प्रशालेतील 25 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. 29 विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले. अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये 75 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. रिधिमा भगवती हिने 98 टक्के गुणांसह अव्वल येत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदी या विषयांत पूर्ण गुण मिळवले. एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये 56.4 टक्के विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. मुर्तजा रावत याने 99.8 टक्के, निहार लोहाडे याने 99.4, ऋषभ कोरलाहल्ली 99.2 टक्के मिळवले.

ऑर्बिस स्कूल्सच्या मुंढवा आणि केशवनगर या दोन्ही संकुलांचा निकाल 100 टक्के लागला. केशवनगर शाळेतील शिवांश सिंग 98.60 टक्के, तर मुंढव्याच्या शाळेतील जैविक मोटा याने 98.2 टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला. यंदाचा निकाल विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचे प्रतीक आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन यश मिळवले. शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यामुळे यश मिळाले आहे, असे मुंढवा येथील द ऑर्बिस स्कूलच्या प्राचार्य स्मिता पेंढारकर यांनी सांगितले.

बावधन येथील रायन इंटरनॅशनल ॲकॅडमीचा निकाल 100 टक्के लागला. रितिका रेओसेकरने 96.8 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. वडगाव बुद्रुक येथील हेलिओस इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या पहिल्याच तुकडीचा निकाल 100 टक्के लागला. अंजली सरगंडलाने 96.8 टक्क्यांसह प्रथम, युग बोराने 95.8 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक मिळवला. संस्कृती स्कूल्सच्या सर्व संकुलांतील शाळांचा निकाल 100 टक्के लागला. आभा भोक्से हिला 98.6 टक्के, रुद्र चौधरी याला 98.4 टक्के गुण मिळाले. ‌’शिक्षक आणि पालक यांचे समन्वयातून विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली,‌’ असे संस्कृती स्कूल्सच्या संस्थापक देवयानी मुंगळी यांनी सांगितले. द कल्याणी स्कूलमध्येही 100 टक्के निकाल लागला. आर्यन गोदानी आणि रोमिल कुलकर्णी यांनी 98.6 टक्क्यांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला.

पुणे विभागाचा निकाल 96.66 टक्के

सीबीएसईने जाहीर केलेल्या निकालात महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल 96.66 टक्के लागला. देशात पुणे विभाग सातव्या स्थानी आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.79 टक्के लागला. पुणे विभागातील 1 हजार 496 शाळांतील एकण 1 लाख 33 हजार 663 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 75 हजार 940 मुले, 57 हजार 723 मुलींचा समावेश होता. त्यातील 75 हजार 771 मुले, 57 हजार 661 मुली असे एकूण 1 लाख 33 हजार 382 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 72 हजार 848 मुले, 56 हजार 85 मुली असे एकूण 1 लाख 28 हजार 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT