पुणे

पुणे : सायबर पोलिस आयुक्तांचं नाव वापरुन अडकवले सेक्सटॉर्शनच्या विळख्यात

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आयटी ऑफिसर म्हणून नोकरी करीत असलेल्या तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल 10 लाख 42 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम सायबर पोलिस आयुक्तांच्या नावाने उकळल्याचा प्रकारही या तक्रारीतून समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक बोगस सायबर कमिशनर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा एका सराफी पेढीमध्ये आयटी ऑफिसर म्हणून काम करतो.

त्याला फेब्रुवारी 2022 मध्ये विवस्त्रावस्थेत असलेल्या महिलेने व्हिडीओ कॉल केला. कॉलदरम्यान महिलेने स्क्रीनशॉट काढले. नंतर तरुणाला तिने स्क्रीनशॉट काढलेले फोटो पाठवून ते नातेवाईक, मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. ते थांबविण्यासाठी तिने तब्बल 39 लाख रुपये ऑनलाइन घेतले. यानंतर तरुणाला सायबर पोलिस आयुक्त श्रीवास्तव नावाने एक फोन आला. त्यानेदेखील संबंधित स्क्रीनशॉट आणि यू-ट्यूबवर अपलोड झालेल्या व्हिडीओतील मुलीला मी पकडतो, असे सांगितले. परंतु, यू-ट्यूबवर अपलोड झालेल्या व्हिडीओसाठी फाइन भरावा लागेल म्हणून त्याने वेळोवेळी तरुणाकडून तब्बल 3 लाख 28 हजार उकळले.

त्यानंतर पुन्हा श्रीवास्तव नावाने त्याला फोन आला. त्याने पोलिसांना तपासासाठी पैशाची आवश्यकता असते म्हणत पुन्हा पैशाची मागणी केली. त्यावर
तरुणाने त्याला 2 लाख 60 हजार पाठविले, तर मे 2022 मध्ये राहुल शर्मा नावाने फोन करून तुम्ही आम्हला 1 लाख 73 हजार 180 रुपये जास्त पाठविले आहेत, ते मी तुम्हाला परत पाठवतो म्हणत तरुणालाच पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणानेही संबंधित व्यक्तीला बळी पडून 4 लाख 27 हजार रुपये पाठविले. दरम्यान, नंतर तरुणाला 14 मे रोजी सायंकाळी पुन्हा फोन आला. ज्या मुलीने व्हिडीओ पाठविला आहे त्या मुलीने आत्महत्या केली असून, तुम्हाला तिच्या नातेवाइकांना पैसे द्यावे लागतील म्हणून फोन आला. त्यावर तरुणाला आपली फसवणूक केली जात असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT