पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बांधकामासाठी नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. हलगर्जीपणे खोदकाम केले. महापालिकेचा डांबरी रस्ता खचुन सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर शनिवारी (दि. 22) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे गुरुवारी (दि. 20) सकाळी 7 वाजता उघडकीस आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे उपअभियंता विनायक बाळासाहेब माने (वय 51, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी घनश्याम सुखवानी (मे.सुखवानी रामचंदानी एलएलपी कंपनीचे भागिदार), संजय रामचंदानी, आर्किटेक्ट विशाल बाफना (सर्व, रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती क्षती निवारण अधिनियम 1984 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम साईटचे काम करताना बाजुला असलेली महापालिकेची पाईप लाईन, महावितरणच्या वीज वाहिन्या आणि पावसाळी पाण्याची लाईन याकडे दुर्लक्ष करून खोदकाम करण्यात आले. त्यामुळे महापालिकेचा रस्ता खचून, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. पर्यायाने नागरिकांची व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आली.
हेही वाचा