पुणे

बैलगाडी, टांगा आणि सायकल कालबाह्य होण्याच्या मार्गावर

Laxman Dhenge

तळेगाव स्टेशन-पुढारी वृत्तसेवा : पुर्वी बैलगाडी,टांगा,सायकल ही महत्वाची वाहने असायची परंतु आता ती यांत्रिकी करणामुळे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी धान्याच्या वाहतूकीसाठी,फळांच्या,भाजी पाल्यांच्या वाहतूकी साठी बैलगाडीचा वापर होत असे परंतु आता टेम्पो, टॕक्टर,ट्रक याचा वापर होत आहे.लग्न कार्यासाठी व-हाड बैलगाडीने जात असे एका गावावरुन दुस-या गावाला जाताना लग्नासाठी व-हाड जाताना 20-25 बैलगाड्या निघत असत. नवरदेवाला,नवरीला आणनेसाठी-नेणेसाठी बैलगाडीचा वापर होत असे काही हौसी मंडळी बैलगाडीत बसलेल्यांना उन, लागू नये पावसात भिजू नये यासाठी तट्टया लावत असत. बैलांच्या गळ्यात घुंगूर माळा (चंगाळे) घालण्यात येत असत.हे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे.

आता लग्नास जाणेसाठी लग्झरी बस, एसटी बस, चारचाकी,याचा वापर होत आहे.नवरीला-नवरदेवाला आणने साठी-नेणेसाठी चार चाकीचा वापर होत आहे.प्रवासा साठी सर्रास एसटीची सोय आहे तसेच 6 सीटर गाड्याही असतात. साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक मात्र ट्रक,टॕक्टर बरोबरच ब-यापैकी बैलगाडीनेही केली जाते.आता बैलगाडी काल बाह्य होण्याच्या मार्गावर आहे. तसेच पूर्वी शहरातले शहरात फिरण्यासाठी टांगा(घोडागाडी)चा वापर होत असे परगावावरुन आलेल्यांना शहरातल्या शहरात फिरण्यासाठी ,नियोजित ठिकाणी जाण्यासाठी-येण्यासाठी टांग्या शिवाय पर्याय नसायचा आता टांग्याची जागा रिक्षाने घेतली आहे.आणि अनेकांकडे दुचाकी, चारचाकी असल्यामुळे टांगाही जवळ, जवळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

तसेच सायकलीचेही प्रमाण कमी होत चालले आहे.पुर्वी सायकलींचा वापर सर्रास असायचा कामासाठी तसेच एका गावावरुन दुस-या गावाला जाणेसाठी एका माणसाला सायकल नेहमी उपयोगी पडत असे कधी कधी डबल सीटही लोक जात-येत होते आता दुचाकीमुळे सायकलही काल बाह्य होण्याच्या मार्गावर आहे.क्वचीतच सायकल चालविणारे दिसतात. शाळकरी मुलांकडे,गारीगार,कुल्पी विकणा-याकडे सायकली क्वचित दिसतात किंवा सायकलींग करणा-या खेळाडूंकडे अथवा सायकलीचा व्यायाम करणा-यांकडे सायकली दिसतात. सकाळ,सकाळ सायकलीत हावा भरणेसाठी पंप मारणेचे दृश्य दुर्मिळ झाले आहे. पूर्वी सायकल मार्ट असत तेथे भाड्याने सायकली मिळायच्या ते आता जवळ जवळ बंद झाले आहे. पुर्वी सायकलीच्या शर्यती असायच्या आता ते प्रमाण कमी झालेचे दिसून येत आहे. जसजसे यांत्रिकी करण वाढत आहे तसतसे बैलगाडी, टांगा, सायकल कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीचे बैलगाडीचे, टांग्याचे,सायकलीचे दिवस आठवले की नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT