ब्रह्मांडाच्या पसार्यात कोट्यवधी घटना दर सेकंदाला घडत असतात. मात्र, तिथंपर्यंत पोहोचणे मानवाला शक्य नाही. मात्र, अशीच एक गूढ घटना आयुकाच्या शास्त्रज्ञांनी टिपली आहे. पृथ्वीपासून सात हजार प्रकाशवर्षे लांब असणारे कृष्णविवर त्याच्यापेक्षा मोठ्या तार्याला गिळू पाहत आहे. पुण्याच्या आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. गुलाब देवांग यांच्यासह तन्मय चतोपाध्याय (स्टॅनफोर्ड, अमेरिका) डॉ. वरुण भालेराव (आयआयटी, मुंबई) यांनी पृथ्वीपासून सात हजार प्रकाश वर्षे लांब असणार्या सिग्नस एक्स-1 या कृष्णविवराजवळ क्ष-किरणे दिसल्याचा शोध आठवडाभरापूर्वींच लावला. जगभरात प्रथम हे संशोधन या तीन भारतीय शास्त्रांनी मांडले. ही नेमकी काय घटना आहे याची माहिती डॉ. देवांग यांच्याकडून जाणून घेतली तेव्हा विश्वाच्या पसार्याविषयीचे कुतूहल अजून वाढले.
अॅस्टोसॅट उपग्रहाद्वारे होतोय अभ्यास
भारताने 2015 मध्ये अॅस्टोसॅट हा उपग्रह अवकाश संशोधनासाठी पाठवला असता. त्याने प्रचंड
मोठा डेटा आणि छायाचित्रे पाठविली त्यावर संशोधन करून या तीन भारतीय शास्त्रज्ञांनी कृष्णविवराच्या बाहेरच्या भागाजवळ क्ष किरणे दिसल्याचे जगाला प्रथमच सांगितले. ही किरणे साध्या क्ष किरणांपेक्षा दोनशे ते सहाशेपट प्रखर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दररोज होते निर्मिती आणि र्हासही
डॉ. देवांग यांनी एक छायाचित्र दाखवले यात सिग्नस नावाचे कृष्णविवर त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या तार्यातील ऊर्जा स्वतःकडे खेचून घेत आहे असे दिसते. यावर ते म्हणाले की, कृष्णविवरात सर्वकाही गडप होते.दररोज शेकडो तारे निर्माण होतात तेवढेच अशाप्रकारे गायबही होतात. सिग्नस हे विवर तारा गिळताना दिसतेय पण या प्रक्रियेला शेकडो वर्षे लागू शकतात. काही ऊर्जा विवर स्वतःकडे मोठ्या तार्याची ऊर्जा खेचत आहे. शेकडो वर्षांनंतर तो ताराही कदाचित कृष्णविवराचाच भाग होऊ शकतो.
वीज नसताना शिकले अन् शास्त्रज्ञ झाले
पुण्यातील आयुका संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे डॉ. गुलाब देवांग यांची भेट झाली. त्यांच्याविषयी कुतूहल जाणून घेतले तेव्हा ते म्हणाले, छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात सोमगुडा नावाचे छोटे गाव आहे. त्या गावात वीज नव्हती, शाळाही नव्हती अशाही स्थितीत ते शिकले. शास्त्रज्ञ झाले. त्यांनी हा शोध लावला. ते म्हणाले, आयुकाचे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर माझे आदर्श आहेत. त्यांच्या विषयीच्या बातम्या वाचून भौतिकशास्त्रज्ञ होण्याची प्रेरणा मिळाली.
अॅस्ट्रोसॅट उपग्रहाच्या साहाय्याने आम्ही तीन शास्त्रज्ञ लांब असलो, तरी एकत्र संशोधन करत आहोत. सिग्नस एक्स-1 नावाच्या कृष्णविवराजवळच्या हालचाली टिपल्या तेव्हा त्याच्या जवळ प्रथमच क्ष किरणांचा स्रोत दिसला. कृष्णविवराभोवती क्ष किरणे व इलोक्ट्रोमॅग्नेटीक लहरी किती प्रभावी असतात, याचा अभ्यास सुरू आहे. अनेक तारे कृष्णविवरे गिळत आहेत. मात्र, तेवढेच नवीनदेखील तयार होतात. ही निरंतर प्रक्रिया ब—ह्मांडात सुरू असते. त्याचे हे प्रत्यक्ष पुरावे टिपता आले व ते जगाला सांगता आले.
– डॉ. गुलाब देवांग, शास्त्रज्ञ, आयुका, पुणे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.