पुणे

भाजप हे गुंडांचे सरकार : आमदार रोहित पवार 

Laxman Dhenge

पुणे : भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही टिकली पाहिजे. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपने केलेल्या भ्याड हल्ल्याच तीव्र निषेध करतो. हे सरकार कुणाचे आहे, कायद्याने चालणार की भाजपच्या गुंडाचं ? हे गुंडांचे सरकार आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. राष्ट्र सेवा दल येथे लोकशाही टिकविण्यासाठी 'निर्भय बनो' या उपक्रमांतर्गत आयोजित सभेला रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आमचाही विरोध केला होता. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार विरोधात बोलतात म्हणून त्यांना विरोध करणे चुकीचे आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT