पुणे

मोठी बातमी : महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले; विक्रम कुमार यांची बदली

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची अखेर मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अतिरिक्त आयुक्तपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तीन वर्षांची मुदत पूर्ण केलेल्या आणि स्थानिक असलेल्या आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातात.

त्यानुसार मागील महिन्यात राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेले पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मात्र, बदली झाली नव्हती. शुक्रवारी संध्याकाळी आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. त्यांची बदली मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT