Bibwewadi Census Completion Pudhari
पुणे

Bibwewadi Census Completion: बिबवेवाडीत घरगणना १००% पूर्ण; जनगणना कामकाज अंतिम टप्प्यात

५२६ प्रगणक व ८८ पर्यवेक्षकांच्या मदतीने कामकाज यशस्वी; पुढील जनगणना २०२७ मध्ये होणार

पुढारी वृत्तसेवा

बिबवेवाडी: प्रदीर्घ कालावधीनंतर देशातील जनगणना घरगणना, घरी यादी कामकाज १६ मे ते १४ जूनदरम्यान झाले होते. संपूर्ण देशभरात या जनगणनेतील पहिल्या टप्प्याचे कामकाज सुरळीतपणे पार पडले, तर पुणे शहर, उपनगर भागातील कामकाज जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या भागामध्ये एकूण ८८ पर्यवेक्षक व ५२६ प्रगणक आणि कार्यालयीन कामकाज करण्यासाठी १२ लेखनिक इत्‍यादींच्या साहाय्याने प्रभागातील संपूर्ण घरगणना कामकाज १०० टक्‍के पूर्ण झाले असून प्रगणक व पर्यवेक्षक यांची बिबवेवाडी येथील हैबतराव शिळीमकर प्राथमिक विद्यालयात नकाशे, प्रगणक प्रमाणपत्र व बँक डिटेल्स जमा करण्यासाठी प्रगणकांची लगबग सुरू होती.

महापालिकेच्या कार्यालयीन विभागाचे कर्मचारी, अधिकारी रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रगणकांनी केलेल्या कामकाजाची माहिती संकलित करण्यासाठी संपूर्ण दिवस उपस्थित राहून घरगणना काम पूर्ण करण्यास सहकार्य केले.

यावेळी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या घरगणना, घरयादी जनगणना विभागाच्या चार्ज ऑफिसर शितल वाकडे यांनी संपूर्ण प्रभागात केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. पुढील महत्त्वाची जनगणना फेब्रुवारी २०२७ अखेर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. सर्व पर्यवेक्षक व प्रगणकांनी घरयादी घरगणना बनवण्याचे कामकाज व्यवस्थित केले आहे. पुढील काही दिवसानंतर जनगणनेचे महत्त्वाचे काम सर्वांना करायचे आहे.

सर्वांनी मिळून ते काम पूर्ण करू, असा विश्वास वाकडे यांनी व्यक्त केला. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख संदीप आमले यांच्या नेतृत्वाखाली कादिर पटेल, रजनीकांत मुलतानी, सौरभ कंडारे, दत्तात्रय कदम, गणेश अण्णापुरे, बसवराज कांबळे, रवींद्र गायकवाड आदी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT