भोर: भोर नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार संग््रााम थोपटे यांची एकहाती सत्ता होती. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 4 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने एकहाती सत्तेला सुरुंग लावला आहे. मात्र, नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाचे बहुसंख्य हे भाजपच्या पारड्यात पडले आहे.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 20 पैकी 16 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली; मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग््रेासचे रामचंद्र श्रीपती (नाना) आवारे 170 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे ’गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था भोर नगरपालिकेत भाजपची झाली आहे. या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, माजी नगरसेवकांचे पती बजरंग शिंदे यांचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आशू ढवळे व जयश्री शिंदे यांना समान मतदान झाल्याने माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले. भाजपच्या स्नेहल तुषार घोडेकर सर्वाधिक 426 मताने विजयी झाल्या आहेत, तर सर्वांत कमी मतांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग््रेासच्या सुरेखा बाळकृष्ण मळेकर 21 मतांनी विजयी झाल्या.
रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे, वैशाली घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 1 ते 5 ची एकाच वेळी मतमोजणी सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आघाडी घेतली, तर तीन ते दहा प्रभागांत भाजपने आघाडी घेतली. फक्त प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने आघाडी घेतली. नगराध्यक्षपदाच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये 245 मतांची भाजपाचे उमेदवार संजय जगताप यांनी आघाडी घेतली; मात्र पुढील प्रभाग क्रमांकमध्ये रामचंद्र आवारे यांनी आघाडी घेत 170 मतांनी विजय संपादन केला. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना आपापल्या प्रभागांमध्ये आघाडी घेता आली नाही. या वेळी भोर शहरातील भेलके पाटील या नावाचे दोन नगरसेवक नगरपालिकेच्या सत्तेत निवडून आले आहेत.
मतमोजणी केंद्राबाहेर निकाल जाहीर होत असताना विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोश करीत होते. विद्यमान आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग््रााम थोपटे यांनी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात पडलेली मते) : नगराध्यक्ष रामचंद्र श्रीपती आवारे (6460), नगरसेवक : अनिल रविकांत भेलके (672 ), सुरेखा बाळकृष्ण मळेकर (664), कुणाल कुमार धुमाळ (503) आणि केदार शशिकांत देशपांडे (496).
भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नगरसेवक पुढीलप्रमाणे (कंसात पडलेली मते) : ॲड. जयश्री राजकुमार शिंदे (549), जगदीश वासुदेव किर्वे (698), रेणुका रवींद्र बदक (698), अमित ज्ञानोबा सागळे (949), तृप्ती अमर सुपेकर (848), मयूरी देविदास गायकवाड (858), जयवंत ज्ञानोबा शेटे (738), कुणाल चंद्रकांत पलंगे (716), मनीषा गणेश पवार (831), गणेश बाळू मोहिते (765), स्नेहल तुषार घोडेकर (833), पल्लवी समीर सागळे (907), सचिन रामचंद्र तारू (869), मनीषा संजय भेलके (548), स्नेहल शांताराम पवार (697) आणि सुमंत सुभाष शेटे (714).