Bhimashankar Temple Pudhari
पुणे

Bhimashankar Temple Closed Mahashivratri: महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद; प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

विकास आराखड्यातील कामांमुळे 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान दर्शन बंद; भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

घोडेगाव: विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला (दि. 12 ते दि. 18) या कालावधीत भाविकांसाठी बंद राहणार आहे. भाविकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

भीमाशंकर मंदिर विकास आराखड्यांतर्गत सभामंडप, पायरी मार्ग, वाहनतळ, भाविक सुविधा केंद्र, स्नानगृहे, शौचालये, पोलिस ठाणे व विश्रामगृह यांसारखी मोठी पायाभूत कामे वेगात सुरू आहेत. मंदिरासमोरचा जुना सभामंडप पूर्णपणे हटविण्यात आल्याने बांधकाम साहित्य, मोठे दगड व यंत्रसामग््राी परिसरात आहे. ही सामग््राी हलविणे शक्य नसल्याने महाशिवरात्रीच्या प्रचंड गर्दीत दर्शनासाठी मंदिर उघडणे धोकादायक ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता.

या कालावधीत महाशिवरात्र येत असल्याने सुरुवातीला सात दिवस उघडे ठेवण्याचा विचार होता. परंतु, सध्या सुरू असलेल्या कामांमुळे व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर नित्यदर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी भाविकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT