भिगवण: रात्रीच्या वेळी लिप्ट देण्याचा बहाणा करून महिलेवर बलात्कार करणाऱ्या दौंड तालुक्यातील जाक्या चव्हाण याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन,मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या घटनेचा तपास अतिशय क्लीष्ट असताना देखील भिगवण, दौंड पोलीस व स्थानिक गुन्हा शोध पथकाने मोठ्या कौशल्याने आणि तेवढ्याच शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.(Latest Pune News)
या गंभीर घटनेबाबत दै.पुढारी ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. जाक्या कोंडक्या चव्हाण(३० रा.माळवाडी,लिंगाळी ता.दौंड जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
यासाठी जवळपास शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासण्यात आले होते तर संशयित आरोपीचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आले होते.ही गंभीर घटना दि.१० ऑक्टोबर रोजी भिगवण येथे रात्री ३:२० वाजता घडली होती.
दि.१० रोजी तरुण महिला ही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला गाडीची वाट पहात थांबली होती.त्यावेळी संबधित महिलेला तुंम्हाला कुठे जायचे आहे ताई,इथून एसटी मिळणार नाही,तुम्हीं माझ्या गाडीवर बसा असे सांगत गाडीवर बसवुन नेले.
दौंड तालुक्याच्या हद्दीत मळद येथे गेल्यानंतर रेल्वे ब्रिजच्या जवळ नेहून गाडी उभी केली आणि संबधित महिलेला ओढत झाडा झुडपात नेले,तिला शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले होते.यावरून महिलेच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा छडा लावण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.
पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासण्यात आले,संशयिताचे रेखाचित्र प्रसारित करण्यात आले,गोपनीय माहिती गोळा करण्यात आली व अखेर सुतावरून स्वर्ग गाठत संशयित म्हणून जाक्या चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.मग मात्र पोलिशी खाक्या दाखवताच त्याने झटक्यात गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , गणेश बिरादार,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, दौंडचे बापू दडस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,दौंड गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, ठाणे अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख, भिगवण गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, ठाणे अंमलदार महेश उगले,सचिन पवार, संतोष मखरे, कुलदीप संपकाळ या संयुक्त पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करीत आहेत.