पुणे

भारतीय जनता पक्षाने दिला गुंडांना आश्रय : आमदार रवींद्र धंगेकर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड भागात भरदिवसा गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कोथरूड भागाची शहरात वेगळी ओळख आहे. या भागातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना आश्रय दिल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी केली. आमदार धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

गुंड मोहोळचा भरदिवसा कोथरूड भागात खून झाला. वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरूडची 'अशांत कोथरुड' अशी ओळख निर्माण झाली आहे. कोथरूड भागात साहित्यिक, कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था कोथरूड परिसरात आहेत. शिक्षणानिमित्त या भागात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. कोथरूडसह पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असे धंंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू आहे. पाटील प्रकरणाचा तपास सुरू आहे की बंद झाला आहे, हे समजत नाही. चौकशीच्या समितीच्या अहवालात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर दोषी आढळले. पोलिसांनी डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी त्यांना सहआरोपी केले नाही. डॉ. ठाकूर यांना या प्रकरणात अटक व्हायला हवी.
ललितला मदत करणार्‍या कारागृहातील अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणामुळे पुण्याच्या नावलौकिकला बाधा पोहचली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धंगेकर यांनी दिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT