पुणे : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचे निष्ठावंत सहकारी, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह वसंतराव भागवत म्हेत्रे (वय ८५) यांचे मंगळवारी (दि. ३०) निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वसंतराव म्हेत्रे यांनी ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात अध्यापन व प्रशासन विभागात उत्तम काम केले. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह म्हणून ते कार्यरत होते.
भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारचे अध्यक्ष, भारती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कुलसचिव जी. जयकुमार यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.