Bhandarkar Institute Exhibition Pudhari
पुणे

Pune Bhandarkar Institute Exhibition: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थाचा 108 वर्षांचा दुर्मीळ ठेवा प्रथमच नागरिकांसाठी खुला

21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान मोफत प्रदर्शन; हस्तलिखिते, महाभारत प्रकल्प आणि जागतिक वारसा ठेवा पाहण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तब्बल 108 वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या दुर्मीळ वस्तूंचा ठेवा जनतेसमोर प्रथमच खुला केला जाणार आहे. दि. 21 ते 23 फेबुवारी या तीन दिवसांत या ठिकाणचा सर्व पुरातन ठेवा प्रदर्शनात मांडला जाणार असून, तो विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोफत बघता येणार आहे.

संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन, नियामक परिषदेचे सदस्य तथा प्रदर्शनाचे समन्वयक संतोष रासकर, मनोज एरंडे यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मभांडारकर संशोधन संस्थेला 108 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. मात्र, इथे नेमके काय काम चालते? ही उत्सुकता विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच केले आहे.

दि. 21 फेबुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहराच्या नूतन महापौर मंजूषा नागपुरे, आंतराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज अंजली भागवत, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत या वेळेत सर्वांकरिता मोफत खुले राहणार आहे.

हा ठेवा बघता येणार

  • संस्थेच्या संग््राहातील

  • महत्त्वाची हस्तलिखिते, ग््रांथ

  • आणि मौल्यवान वस्तू, संशोधन प्रकल्प ज्ञानसागर या प्रदर्शनात बघता येतील.

  • महाभारत-सांस्कृतिक सूचीसह या संशोधन प्रकल्पातील ‌‘भीम‌’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

  • संयुक्त राष्ट्र संघाच्या ‌‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर‌’मध्ये समाविष्ट हस्तलिखिते, सुलेखन असलेली हस्तलिखिते, भारतीय अन्‌‍ परदेशी भाषांमधील दुर्मीळ पुस्तके

  • संस्थेची 300 हून अधिक प्रकाशने, महाभारत, भागवत, अथर्ववेद, कोरीव लेख, वैज्ञानिक हस्तलिखिते, खगोलशास्त्रीय उपकरणे

  • देशातील मोठ्या शब्दकोशांपैकी एक, प्राकृत-इंग््राजी शब्दकोश प्रकल्प, ऐतिहासिक जैन व्यक्तिमत्त्वांचा कोश जैन प्रोसोपोग््रााफी

  • इन्फोसिस विद्या प्रकल्पातील संशोधकांनाही या ठिकाणी भेटता येईल

  • संस्थेचे डिजिटल उपक्रम, भारत विद्या प्लॅटफॉर्म यांचा अनुभव

  • वेरुळच्या शिल्पांचे डिजिटल संवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT