Whole Dried Coconut Pudhari
पुणे

Gultekdi Market Rates: पुण्यात भगर व गोटा खोबरे महागले; गुलटेकडी मार्केट यार्डात दरवाढ

उत्पादन घटल्याने आवक कमी; मागणी वाढल्यामुळे भगरच्या दरात किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ, गोटा खोबऱ्यालाही तेजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भगरीचे उत्पादन घटल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात भगरीची आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भगरीचे भाव तेजीत आहेत. आठवडाभरात किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. तर गोटा खोबराची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यात दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. ग्राहकांकडून केवळ दर्जेदार मालालाच मागणी आहे. त्यामुळे आठवडाभरात भावात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात या आठवड्यातही संमिश्र चित्र पाहायला मिळाले. भगर आणि गोटा खोबरे यांच्या दरात वाढ झाली असून, शेंगदाणा, साबुदाणा, डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल, बेसन, साखर आणि इतर बहुतेक जिन्नसांचे भाव स्थिर राहिले आहेत. सध्या कोणताही मोठा सण-उत्सव नसल्याने बाजारातील खरेदी मर्यादित असून व्यवहारांमध्ये मंदीचे वातावरण कायम आहे. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतरही गुळ-भुसार बाजारात अपेक्षित मागणी वाढलेली नाही. त्यामुळे बहुतांश जिन्नसांचे दर स्थिर आहेत. डिझेल दरवाढीचा थेट परिणाम अद्याप बाजारावर दिसून आलेला नसला, तरी वाहतूक खर्च वाढल्यामुळे आगामी काळात त्याचा परिणाम विविध मालांच्या किमतींवर जाणवू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

साखरेचे दर मागील आठवड्याच्या पातळीवरच कायम आहेत. दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे दौंड, केडगाव आणि सांगली परिसरातील अनेक गुऱ्हाळे बंद झाली आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ८० टन होणारी गुळाची आवक घटून २० टनांपर्यंत आली आहे. आवकेत मोठी घट झाल्यानंतरही मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे गुळाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. शेंगदाणा, साबुदाणा, सर्व प्रकारच्या डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल, बेसन तसेच नारळाचे भावही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात सध्या सावध खरेदी सुरू असून, मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याशिवाय दरांमध्ये मोठे चढ-उतार होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४१५०-४२०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ३६५०-४२००, मसुरी ३१००-३५००, सोना मसूरी ४४००-७४००, एच.एम.टी. कोलम ५७००-६०००, लचकारी कोलम ६६००-७१००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४१५०-४४००, लोकवन नं. २ ३७००-३९००, नं.३ ३०७५-३६५०, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर २८५०-२९०० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी :- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४०५०-४७५०, गूळ नं.२ ४४५०-४५५० गूळ नं.३ ४३००-४४००, बॉक्स ४४००-५४०० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२००० रु.

कडधान्ये :-हरभरा ७१००-७५००, हुलगा ६३००-७०००, चवळी ७८००-९८००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२०००, मटकी गावरान १५०००-१६७००, मटकी पॉलिश ८७००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम १७५००-१८७००, वाटाणा हिरवा ५५००-५५००, वाटाणा पांढरा ५०००-५२००, काबुली चणा ७४००-१०८०० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३७०००-३९००० रु. शेंगदाणा :- जाडा ११०००-१२५००, स्पॅनिश–१२३००-१३८००, घुंगरु ११२००-१२७०० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन :- (५० किलोस) ३९००-४६५० रु. मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT