Pune Fish Prices: मासेमारी बंदीचा फटका; पुण्यात मासळीचे दर दुप्पट, इंग्लिश अंडीही महागली

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद असल्याने मासळीची आवक निम्म्यावर; अनेक प्रकारचे मासे बाजारातून गायब
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर सध्या मासेमारी पूर्णपणे बंद असून, पूर्व किनारपट्टीवर मर्यादित प्रमाणात मासेमारी सुरू आहे. त्यामुळे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून येणाऱ्या मासळीची आवक नेहमीपेक्षा निम्म्याहून कमी झाली आहे.

Fish
Kesanand Land Fraud: केसनंद जमीन घोटाळा उघड; बनावट अकृषिक परवानगी प्रकरणी वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल

परिणामी, मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली असून अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध नसल्याची माहिती गणेश पेठेतील मासळी व्यापारी ठाकुर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मात्र, इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.

Fish
Balbharati Textbook Class 3: तिसरीच्या पुस्तकातून कुटुंब, संस्कृती आणि पर्यावरण शिक्षणावर भर

रविवारी (दि. १४) खोल समुद्रातील मासळी ५ ते ६ टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. तेलंगणा येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ ते १५ टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकनचे विक्रेते रुपेश परदेशी आणि मटण विक्रेते संघटनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Fish
Maharashtra Tri Language Policy: त्रिभाषा सूत्राला स्थगिती; यंदा जुन्याच पद्धतीने शाळा सुरू

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : २५००-२७००, मोठे : १८००-२२००, मध्यम : १४००-१७००, लहान : १०००-१२००, भिला : ९००-१०००, सुरमई १०००-१८००, रावस : १२००-१५००, घोळ : १०००-१२००, वाम : पिवळी १५००-१८००, काळी : ६००-७००, ओले बोंबील : ६००-७००. कोळंबी : लहान : ३५०-५००, मध्यम : ५००-६००, मोठी : १०००-१२००, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : १०००-१२००, लॉबस्टर : १८००-१९००, मोरी : ५००-६००, मांदेली : १६०-२००, चिंबोर्‍या : ६००-८००.

Fish
Pune Police Diesel Shortage: पुणे पोलिसांसमोर इंधन संकट; डिझेल साठा संपल्याने वाहनसेवा प्रभावित

खाडीची मासळी:

सौंदाळे : ४५०-५५०, नगली : ५००-६००, बांगडा : २५०-३५०, बेळुंजी : १६०-२००, तिसर्‍या : ३००, तारली : ३००. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ४००-४५०, शिवडा : ३००, खवली : २५०-३००, आम्ळी : १६०-२००, खेकडे : ३००-४००, चिलापी : १००-१६०, वाम : ५५०-६००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६७०, डझन ९०, प्रतिनग ७.५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news