Chakan Market Yard Rates: चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याला तेजी; भाजीपाल्याचे दरही वधारले

कांद्याची आवक १,५०० क्विंटलवर स्थिर; भेंडी, दोडका, फरशी, वालवड आणि पालेभाज्यांच्या भावात वाढ, बाजाराची उलाढाल ५.८० कोटींवर
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहून दरात वाढ झाली. हिरवी मिरची व गाजराची मोठी आवक झाली. दोडका, चवळी, भेंडी, वालवड व फरशी यांचे भाव तेजीत राहिले. फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी ८० लाख रुपये झाली.

Onion
Pune Fish Prices: मासेमारी बंदीचा फटका; पुण्यात मासळीचे दर दुप्पट, इंग्लिश अंडीही महागली

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार ५०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,००० ते १,८०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. लसणाला १३ हजार रुपये कमाल भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार ५०० रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion
Kesanand Land Fraud: केसनंद जमीन घोटाळा उघड; बनावट अकृषिक परवानगी प्रकरणी वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल

शेतीमालाची आवक व बाजारभाव :

कांदा - एकूण आवक - १,५०० क्विंटल. भाव क्रमांक - १ - १,८०० रुपये, भाव क्रमांक २ - १,३०० रुपये, भाव क्रमांक ३ - १,०००. बटाटा - एकूण आवक -‌ २,००० क्विंटल. भाव क्रमांक १ - १,५०० रुपये, भाव क्रमांक २ - १,२०० रुपये, भाव क्रमांक ३ - ९०० रुपये.

फळभाज्या - फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेला भाव :

Onion
Balbharati Textbook Class 3: तिसरीच्या पुस्तकातून कुटुंब, संस्कृती आणि पर्यावरण शिक्षणावर भर

टोमॅटो - ३१५ क्विंटल (२,००० ते ३,००० रुपये), कोबी - १८० क्विंटल (१,५०० ते २,०००), फ्लॉवर - २१० क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी - ११६ क्विंटल (१,००० ते २,५००), भेंडी - ६९ क्विंटल (३,००० ते ४,०००), दोडका - ५९ क्विंटल (४,००० ते ६,०००), कारली - ६५ क्विंटल ( ४,००० ते ५,०००), दुधीभोपळा - ६२ क्विंटल (१,५०० ते ३,०००), काकडी - १०८ क्विंटल (२,००० ते ४,०००), फरशी - २४ क्विंटल (५,००० ते ७,०००), वालवड - ८ क्विंटल (८,००० ते १०,०००), ढोबळी मिरची - १४८ क्विंटल (४,००० ते ६,०००), चवळी - ३२ क्विंटल (२,५०० ते ३,५००), वाटाणा - ३० क्विंटल (६,००० ते ८,०००), शेवगा - ३२ क्विंटल (३,००० ते ४,०००), गाजर - ११० क्विंटल (२,००० ते ३,०००), गवार - ७८ क्विंटल (३,००० ते ६,०००), आले - २०० क्विंटल (५,००० ते ७,०००).

Onion
Maharashtra Tri Language Policy: त्रिभाषा सूत्राला स्थगिती; यंदा जुन्याच पद्धतीने शाळा सुरू

पालेभाज्या: चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाव: मेथी - एकूण ६ हजार १९० जुड्या (२,००० ते २,५०० रुपये), कोथिंबीर - एकूण २३ हजार १८० जुड्या (१,००० ते १,५००), शेपू - एकूण २ हजार ०९० जुड्या (१,५०० ते २,०००), पालक - एकूण ३ हजार ०५० जुड्या (८०० ते १,३००).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४५ जर्सी गायींपैकी ४० गायींची विक्री झाली. त्यांना १५ ते ७० हजार रुपये किंमत मिळाली. ६० बैलांपैकी ४८ बैलांची विक्री झाली. त्यांना १० ते ४० हजार रुपये किंमत मिळाली. ९० म्हशींपैकी ७५ म्हशींची विक्री झाली. या म्हशींना ३० ते ८० हजार असा भाव मिळाला. १,२२० शेळ्या-मेंढ्यापैकी ९८० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २ ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news