पुणे

सावधान ! लहान मुलांमध्ये वाढताहेत श्वसनाचे विकार; ही घ्या काळजी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पडणारा पाऊस, कमी-जास्त होणारी थंडी आणि पहाटे शहरावर पसरणारे धुके, अशा संमिश्र वातावरणामुळे लहान मुलांमध्ये श्वसनविकार झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे. लहान मुलांमध्ये खोकला आणि दमा यांसारखे आजार वाढत आहेत. हिवाळ्यात श्वसनविकाराच्या समस्यांना आमंत्रण मिळते. या दिवसांत अ‍ॅलर्जीची लक्षणेही अधिक तीव्र होतात, तसेच श्वासोच्छ्वासाच्या समस्यांमध्येही वाढ होते. या समस्या विशेषतः बालदमा असलेल्या मुलांमध्ये अधिक दिसून येतात. श्वसनलिकेवर सूज आल्यामुळे श्वासोच्छ्वास प्रक्रियेत अडचणी येतात. श्वास सोडताना छातीतून सतत शिट्टीसारखा आवाज येत असल्यास मुलांना बालदमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते.

बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, श्वसनसंसर्गाचे वाढते प्रमाण ही या समस्येमागील तीन प्रमुख कारणे आहेत. पालकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे असून, घशासंबंधी विकार आढळताच मुलांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगावे. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ब्रॉंकायटीसचे प्रमाण वाढले आहे. बालरुग्णांमध्ये 15-20 दिवस खोकला बरा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

डॉ. सम्राट शहा

अस्थमाच्या लक्षणांचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांइतकेच निरोगी आहार आणि पुरेसे हायड्रेशन महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालरोगतज्ज्ञांशी नियमित संपर्कात राहा. पालकांनी मुलांची योग्य काळजी घ्यावी आणि मुलांसोबत प्रवास करताना वैद्यकीय सुविधांबाबत जागरूक राहावे.

डॉ. विश्रुत जोशी

काय काळजी घ्यावी?

  •  सकाळच्या थंड वातावरणात ज्या वेळी धुक्याचे प्रमाण अधिक असते अशा वेळी व्यायाम करणे टाळा.
  •  घराबाहेर पडताना ऊबदार कपडे घालायला विसरू न
  • रूमहीटर वापरण्यापूर्वी ते स्वच्छ करावे; कारण वर्षभर न वापरल्यामुळे यामध्ये धूळ आणि बुरशीजन्य संसर्ग आढळून येऊ शकतो.
  •  कोरड्या हवेचा त्रास टाळण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा.
  •  घराची व आजूबाजूच्या परिसराची नियमित साफसफाई करा.
  •  बेडशीट, पडदे गरम पाण्याने धुवा; जेणेकरूम संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT