पुणे

सावधान ! घरपोच सिलिंडर सेवेत गॅस चोरी; गॅस एजन्सीवर गुन्हा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गॅस एजन्सीकडून घरपोच येणार्‍या सिलिंडरमधील गॅसची चोरी झालेली असू शकते. शहरातील काही गॅस एजन्सीचालक कामगारांना हताशी धरून गॅस सिलिंडरमधून दीड ते दोन किलो गॅस काढून घेतात. याप्रकरणी एका गॅस एजन्सीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे तुमच्याकडे येणारा सिलिंडर वजन करून घेतल्यास फसवणूक टाळता येईल.

शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तीन तेल कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. मात्र, काही गॅस एजन्सीचालक सिलिंडरमधील गॅसची चोरी करतात. ग्राहकाने पूर्ण पैसे देऊनही दीड ते दोन किलो गॅस कमी घ्यावा लागतो. सिलिंडर घरी देताना वितरकाने सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक असून, वजन काटा नसल्याचे कारण देत डिलिव्हरी बॉय वजन करून देण्यास नकार देतो.

दरम्यान, कोरेगाव पार्कमधील बोले गॅस एजन्सीकडे मंगळवार पेठेतील रहिवासी असलेले जॉन्सन कोल्हापुरे यांनी सिलिंडरची नोंदणी केली होती. त्यानुसार डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन आला. त्या वेळी कोल्हापुरे यांना वजन कमी असल्याची शंका आल्याने ते वजन करून दे अशी विनंती केली. त्यावर डिलिव्हरी बॉयने वजन काटा नसल्याचे सांगत हात झटकले. परंतु, कोल्हापुरे यांनी जवळच्या एका दुकानात सिलिंडरचे वजन केले, त्या वेळी सिलिंडरमध्ये 1.925 किलो ग्रॅम गॅस कमी असल्याचे समोर आले. त्या वेळी सिलिंडर लिक असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोल्हापुरे यांनी दुसरा सिलिंडर वजन करून दे, अशी मागणी केली, मात्र सिलिंडर न देता डिलिव्हरी बॉय निघून गेला. कोल्हापुरे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार समर्थ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल केला आहे.

10 ते 30 रुपये द्यावे लागतात

शहरात तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडर पुरवले जात असून, सिलिंडर घरपोच देण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र, शहरातील काही भागांमध्ये डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैस उकळले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असून, ग्राहकांनी पैसे न देता त्यांची तक्रार कंपनीच्या ग्राहकसेवा अधिकार्‍यांकडे करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT