देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे उद्घाटन | पुढारी

देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे उद्घाटन

द्वारका; वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठ्या केबलवर तोलल्या गेलेल्या पुलाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ओखा शहराला व अरबी समुद्रातील बेट द्वारका या बेटाला जोडणारा हा पूल भाविकांसाठी आता खुला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. देवभूमी द्वारका येथे पंतप्रधानांनी भेट दिली व दर्शनही घेतले. तसेच या पुलाचे उद्घाटन केले. चारपदरी असलेल्या या देखण्या पुलाचे उद्घाटन केल्यावर पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर त्याची छायाचित्रेही शेअर केली.

असा आहे पूल

अंतर ः 2.32 कि.मी.
रुंदी ः 27.20 मीटर
ठिकाण ः ओखा ते बेट द्वारका
नाव ः सुदर्शन सेतू
वैशिष्ट्य ः फक्त केबलच्या आधारे तोलला गेलेला देशातील सर्वात मोठा पूल
खर्च ः 979 कोटी रु.
केबलचा भाग ः 900 मीटर
रस्त्याचा भाग ः 2.45 किमी

नवीन काय

पुलावर अडीच मीटर रुंदीचा फूटपाथ
भिंतीवर ‘श्रीमद् भगवतगीते’तील श्लोक आणि श्रीकृष्णाची चित्रे
पुलासाठी सौर ऊर्जेचा वापर

Back to top button