पुणे

सावधान! वायू प्रदूषणामुळे आजारांना आमंत्रण

Laxman Dhenge

पुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील वायू प्रदुषणामुळे होणार्‍या आजारांत मोठी वाढ झाली आहे. हवा खराब गटांत असेल अन् तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर कान, नाक, घसा या भागात ते प्रथम जाते. त्यामुळे घसा खवखवणे, नाकातून स्राव गळणे, त्वचेवर लालसर पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, हे आजार लवकर बरे होत नाहीत. पुण्यात या तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वातावरणातील अनेक प्रदूषकांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, मात्र तो लगेच दिसत नाही.

कारण प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. त्याप्रमाणे शरीर ते सहन करते. मात्र, काही जणांना त्याचा लगेच त्रास होतो. ज्यांना श्वासाचा त्रास होतो त्यांना वातावरणातील बदल लगेच कळू लागतो. हल्ली शहरात कान, नाक घसा याविषयी प्रदूषणामुळे अनेक त्रास झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रामुख्याने जे लोक दररोज दुचाकीवरून लांबचा प्रवास करतात त्यांना या तक्रारी जास्त आहेत. कारण त्यांच्या नाकात, घशात सर्वाधिक प्रदूषित घटक वातावरणातून जातात. हेल्मेट किंवा मास्क घातलेला नसेल तर या प्रदूषित घटकांचा परिणाम होत आहे.

हिवाळ्यात धूलिकणांचा परिणाम जास्त

एका खासगी वैद्यकीय संस्थेने भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे व अहमदाबाद या चार वाहन प्रदूषणात आघाडीवर असणार्‍या शहरांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले की, धूलिकणांचे प्रमाण पावसाळा संपताच वाढू लागते. कारण आकाश निरभ— होते, वार्‍याचा वेग वाढतो. त्यामुळे धूलिकणांचा प्रवास वेगाने वाढतो. उन्हाळ्यात हे प्रदूषण अधिक वेगाने वाढते.

हिवाळ्यात धूलिकणांचा परिणाम जास्त

एका खासगी वैद्यकीय संस्थेने भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे व अहमदाबाद या चार वाहन प्रदूषणात आघाडीवर असणार्‍या शहरांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले की, धूलिकणांचे प्रमाण पावसाळा संपताच वाढू लागते. कारण आकाश निरभ— होते, वार्‍याचा वेग वाढतो. त्यामुळे धूलिकणांचा प्रवास वेगाने वाढतो. उन्हाळ्यात हे प्रदूषण अधिक वेगाने वाढते.

हे प्रदूषित घटक जास्त घातक

  • कार्बन मोनोऑक्साइड : जेव्हा इंधनातील कार्बन पूर्णपणे जळत नाही तेव्हा कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. हवेतील कार्बन मोनोऑक्साइडचा मुख्य स्रोत वाहन उत्सर्जन आहे. तो शरीरात जाताच अवयवांना आणि ऊतींना ऑक्सिजनचे वितरण कमी करतो. ज्यांना हृदय आणि श्वसनाचे आजार आहेत त्यांच्यासाठी हे सर्वात हानिकारक आहे.कार्बन डायऑक्साइड : कार्बन डायऑक्साइड हा मोटार वाहनांद्वारे उत्सर्जित होणार्‍या सर्वात प्रमुख हरितगृह वायूंपैकी एक आहे.
  • नायट्रोजन ऑक्साइड्स : जेव्हा मोटार वाहनांच्या इंजिनमध्ये इंधन जास्त तापमानात जळते तेव्हा नायट्रोजन ऑक्साइड तयार होतात.
  • पार्टिक्युलेट मॅटर : (सुक्ष्म (10) अतिसुक्ष्म (2.5)
  • वायुजन्य कण हे हवेत आढळणार्‍या घन किंवा द्रव कणांची संज्ञा आहे. काही कण काजळी किंवा धूर म्हणून दिसतात. ते मोठे किंवा गडद असतात, परंतु सूक्ष्म कण इतके लहान असतात की, ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. सूक्ष्म कण हे आरोग्यासाठी मोठ्या चिंतेचे कारण आहे. हे सूक्ष्म कण फुफ्फुसाच्या खोलवर पोहोचू शकतात. आरोग्यावरील परिणामांमध्ये दमा, कठीण किंवा वेदनादायक श्वासोच्छवास आणि क्रॉनिक  ब्रॉंकायटिस यांचा समावेश होतो. विशेषत: मुले आणि वृद्धांमध्ये हा त्रास लवकर जाणवतो.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT