Baramati-Rahuri By Election Voting Pudhari
पुणे

Baramati-Rahuri By Election Voting: बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

बारामती/राहुरी: बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, गुरूवारी (दि. 23) मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

महायुतीकडून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले निवडणूक रिंगणात आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आधी उमेदवार दिला होता.

मात्र त्याच्या माघारीनंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर राहुरीत अक्षय कर्डिले यांच्याविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.

त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीनेही संतोष चोळके यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.

बारामतीत 478 केंद्रांवर मतदान होणार असून, 3 लाख 84 हजार 579 मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. राहुरीत 374 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 3 लाख 33 हजार 545 मतदार आहेत.

प. बंगाल, तमिळनाडू राज्यांत आज मतदान

नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, तमिळनाडू विधानसभेसाठी गुरुवारी (23 एप्रिल) मतदान हात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 152 जागांवर, तमिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी मतदान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT