Assault Pudhari
पुणे

Baramati Police Sub Inspector Case: विवाहितेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा

पोलिस भरतीत मदतीचे आमिष दाखवल्याचा आरोप; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात एका पोलिस उपनिरीक्षकावर तर या कामी मदत केल्याप्रकरणी पोलिस बॅण्डमधील एका कर्मचाऱ्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ भीमराव कुंभार (रा. बीईजी सेंटर, गंधमनगर, येरवडा, पुणे, मूळ रा. जंक्शन, ता. इंदापूर) व नवी मुंबई पोलिस बॅण्डमधील कर्मचारी मारुती विष्णू करे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात शारीरिक अत्याचार, विनयभंगासह ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी ५ जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस भरतीत मदत करण्यातून ही घटना घडल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

बारामतीतील संभाजीनगर परिसरात फिर्यादी या बॅण्ड क्लाससाठी गेल्या असताना मारुती करे हे तेथे आले. अमरनाथ कुंभार हे तुम्हाला भेटायला आले आहेत. ते गाडीत बसले आहेत, असे म्हणत त्यांनी फिर्यादी महिलेला एका मोटारीकडे नेले. फिर्यादीची तिकडे जाण्याची इच्छा नसताना पोलिस भरतीचा प्रेशर निर्माण करून त्यांना मोटारीपर्यंत नेण्यात आले.

तेथे कुंभार हे मोटारीत (एमएच १२, एमबी २१०४) बसले होते. फिर्यादीला या मोटारीत बसवून करे यांच्या सदनिकेत नेण्यात आले. तेथे गेल्यावर थंड पेय घेऊन येतो, असे सांगत करे हे बाहेर गेले. त्यानंतर कुंभार यांनी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती करत शारीरिक अत्याचार केला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT