Baramati Panchayat Samiti Pudhari
पुणे

Baramati Panchayat Samiti Election: बारामती पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निर्णय सुनेत्रा पवारांकडे

राष्ट्रवादीच्या बहुमतीसह सभापतीपद खुल्या गटासाठी; उपसभापती पद महिला सदस्याकडे जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती पंचायत समितीच्या 12 पैकी 10 राष्ट्रवादी कॉंग््रेासने जिंकल्या आहेत. दोन जागा भाजपकडे असल्या तरी तेथे राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले नव्हते. 10 सदस्यांपैकी एकाच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे. मार्चमध्ये या निवडी होणार आहेत. त्याचे सर्वाधिकार आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. त्या सुचवतील त्या सदस्याला या खुर्चीचा बहुमान मिळेल.

बारामती पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे तालुक्यातील 10 गणांतील कोणताही सदस्य या ठिकाणी सभापती होऊ शकतो. पुरुष किंवा महिलांनाही संधी मिळू शकते. परंतु, सद्य:स्थितीत तालुक्यातील एकूण कारभार व कामाची व्याप्ती लक्षात घेता पुरुष सदस्याला सभापतिपदाची संधी मिळू शकते. त्यासाठी सध्या पणदरे गणातील किरण रावसाहेब तावरे, निंबुत गणातील दिग्विजय धन्यकुमार जगताप आणि वडगाव निंबाळकर गणातील जितेंद्र भगवान पवार यांची नावे चर्चेत आहेत.

पक्षाच्या युवक अध्यक्षपदी केलेले काम आणि त्यानंतर पत्नीला जिल्हा परिषदेला सदस्यपदी मिळालेल्या संधीमुळे केलेली विकासकामे, जनसंपर्क लक्षात घेता तावरे यांच्या गळ्यात ही माळ पडू शकते. ऐनवेळी नवीन चेहऱ्याला संधी द्यायचा निर्णय झाला तर जगताप, पवार यांची नावे पुढे येऊ शकतात. जगताप यांनी ग््राामपंचायत पातळीवर काम केले आहे. त्यांच्याकडेही अनुभव आहे, तर पवार यांनी सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण केलेली आहे.

उपसभापतिपद महिला सदस्याकडे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सभापती-उपसभापती निवडीत बागायती भाग व जिरायती भाग, असा समतोलही साधला जाऊ शकतो. भाजपकडे केवळ दोन सदस्य असल्याने ते काय भूमिका घेतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी-भाजपने एकत्र यायचे ठरविले, तर भाजपच्या वाट्यालाही उपसभापतिपद जाऊ शकते.

सभापती-उपसभापती या दोन्ही पदांवर कोणाला संधी द्यायची, ही दोन्ही पदे किती कार्यकाळासाठी दिली जाणार, याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना आहेत. त्यांनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. त्या काय निर्णय घेतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT