Social Media Abuse Pudhari
पुणे

Baramati Minor Girl Social Media Abuse: अल्पवयीन विद्यार्थिनीवर सोशल मीडियावर छळ, पीडितेची पोलिसांत तक्रार

फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर छळ केल्याप्रकरणी निखिल जांबलेविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: अल्पवयीन विद्यार्थिनीला वारंवार गाठत तिची भेट घेणाऱ्या तरुणाला तरुणीने प्रतिसाद देण्याचे बंद करताच त्याच्या सोशल मीडिया खात्यावरील स्टोरीला संबंधित विद्यार्थिनीचे फोटो ठेवत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी त्याच्याविरोधात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

निखिल जांबले (रा. साबळेवाडी, शिर्सुफळ, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दाखल केली. सन 2023 पासून हा प्रकार सुरू आहे. त्या वेळी निखिलने तिच्या इन्टाग््राामवर मेसेज केला होता. हे दोघे इन्स्टाग््राामवरून बोलत होते. काही दिवसांनी त्याने तिचा मोबाईल क्रमांक मागितला. तो चांगल्या ओळखीचा असल्याने तिने तो दिला. त्यानंतर तो तिच्याशी फोनवर बोलू लागला.

काही दिवसांनंतर ती बारामतीत शिक्षणासाठी येऊ लागल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी शाळेबाहेर येऊ लागला. 2024 मध्ये तिने बारामतीजवळ एका महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहण्यास आली. त्या वेळी या दोघांमध्ये बोलणे होत होते.

एकेदिवशी त्याने तिथे जात, ‌‘तू माझ्यासोबत चल,‌’ असे म्हणत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न केली. परंतु, शिक्षण सुरू असल्याने तिने ही बाब कोणाला सांगितली नाही. त्याच्याशी तिने बोलणे बंद केले. तरीही तो तिला व्हॉट्‌‍सॲपवर मेसेज करीत होता.

25 फेबुवारी रोजी ती बारावीचा अखेरचा पेपर देत घरी आली. त्यानंतर 27 रोजी तिच्या मावसभावाला जांबले याने फेसबुकवर तिचे फोटो व लव्हहार्टचे इमोजी ठेवल्याचे सांगितले. तिने खात्री करून घेतली असता हा प्रकार खरा असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT