EVM  Pudhari
पुणे

Baramati Bypoll EVM Security: बारामती पोटनिवडणुकीनंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित

दुहेरी सुरक्षा व 24x7 सीसीटीव्ही निगराणीखाली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे; 4 मे रोजी मतमोजणीला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीत 23 एप्रिल रोजी 478 मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे बारामती एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निरीक्षक, उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छायाचित्रणासह सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा ताळेबंद करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या साठवण व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्ट्राँग रूमसाठी दुहेरी स्तराची सशस्त्र सुरक्षा तसेच 24 बाय 7 सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे. राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रेदेखील त्याच ठिकाणी स्वतंत्र राखीव स्ट्राँग रूममध्ये निर्धारित सुरक्षा नियमांनुसार साठविण्यात आली आहेत.

सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्राँग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांना अंतर्गत सुरक्षा परिघाबाहेर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही प्रदर्शनाची व आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 58.17 टक्के मतदान झाले असून, मतमोजणी 4 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या वेळी निवडणूक निरीक्षक, उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येणार आहे, अशी माहिती दिघे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT