Baramati Double Murder Pudhari
पुणे

Baramati Crime: बारामतीत चुलत सासू-सुनेची गळा चिरून हत्या; शेरीचीवाडीत खळबळ

ओसरीवर झोपलेल्या दोघींवर मध्यरात्री हल्ला; दागिने व घरातील वस्तू सुरक्षित, हत्येचे गूढ कायम

पुढारी वृत्तसेवा

सुपे: बारामती तालुक्यातील बाबुर्डी अंतर्गत असलेल्या शेरीचीवाडी येथे चुलत सासु-सुनेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. एकाच वेळी या ज्येष्ठ महिलांची हत्या झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) अशी हत्या झालेल्या सासू-सुनेची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. २८) संध्याकाळी घराच्या शेजारी कार्यक्रम होता. त्यानंतर ते घरी झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने घराच्या ओसरीवर झोपलेल्या असलेल्या इंदुमती आणि कृष्णाबाई यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ग्रामस्थांना ही घटना मंगळवारी सकाळी दिसली.

इंदुमती यांचा मुलगा गणेश मारुती लडकत हा बारामती पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणून नोकरीस आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यातील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला, तसेच ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन माग काढण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात सुपे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही घटना चोरीच्या उद्देशाने घडलेली दिसत नाही. या महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तसेच घरातील कपाटातील काही वस्तूची चोरी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या घटनेचे गूढ कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT