Baramati Cyber Fraud Pudhari
पुणे

Baramati Cyber Fraud: बारामतीत पुन्हा सायबर ठगांकडून 92 लाखांची फसवणूक

हॉस्पिटल आणि प्रथितयश डॉक्टरांच्या खात्यातून वळवली रक्कम

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती शहर व परिसरात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक घोटाळ्याची घटना समोर आली आहे. या वेळी खाते ‌‘कॉम्प्रमाईज‌’ करून तब्बल 92 लाख 50 हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली. ही रक्कम येथील गिरिराज हॉस्पिटल व संबंधित प्रथितयश डॉक्टरांच्या खात्यातून लंपास करण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांत सायबर फसवणुकीच्या चार घटना उघडकीस आल्या असून, त्यापैकी तीन शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तर एक तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही संशयास्पद फोन कॉल किंवा ओटीपी शेअर न करता थेट खाते हॅक करून व्यवहार करण्यात आले. आयएमपीएस व आरटीजीएसच्या माध्यमातून ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. 6 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सायबर फसवणूक आली दारापर्यंत

बारामती शहर पोलिस ठाणे हद्दीत अलॉकिडील काळात सायबर फसवणुकीच्या तीन गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. या तिन्ही घटनांमधून एक अत्यंत महत्त्वाचा धडा समोर आला आहे की, सायबर गुन्हेगार प्रथम नागरिकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर विविध युक्त्या वापरून त्यांची आर्थिक फसवणूक करतात, हे स्पष्ट झाले आहे.

घटना क्र. 1

74 वर्षीय ज्येष्ठ महिलेला व्हॉट्‌‍सॲपवर व्हिडीओ कॉल आला. समोरील व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात, मी अधिकारी असून, तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगितले. ज्येष्ठ महिलेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तिच्यावर दबाव निर्माण केला. तपासाच्या नावाखाली त्यांचे पैसे सुरक्षित खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. भीतीपोटी महिलेने एफडी रक्कम तोडून वेगवेगळ्या खात्यांवर 45 लाख 60 हजारांची रक्कम पाठवली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घटना क्र. 2

व्हॉट्‌‍सॲपवरील स्टॉक मार्केट एक्सपर्ट नावाच्या ग््रुापमध्ये एका व्यक्तीला सहभागी करून घेत शेअर मार्केट, आयपीओ व ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फेक ॲपद्वारे मोठा नफा होत असल्याचे भासवले गेले. त्यानंतर ट्रेडिंगसाठी रक्कम कमी पडत असल्याचे सांगत त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून 1 कोटी 30 लाखांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर भरून घेत फसवणूक केली गेली. त्यानंतर फेक ॲप बंद केले गेले.

घटना क्र. 3

बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेत 68 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली. यूएसएमधील ॲनिश मॅथ्यू नामक व्यक्तीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तक्रारदाराला मोबाईलवर अज्ञाताची फेंड

रिक्स्वेस्ट आली. त्यानंतर त्या व्यक्तीने ऑनलाइन ट्रेडिंग बिझनेससाठी व्हॉट्‌‍सॲपवर लिंक देत तक्रारदाराचे खाते काढून दिले. त्यानुसार पहिल्यांदा नफा झाल्याचे सांगत 4,950 रुपयांचा नफा दिला. त्यानंतर ट्रेडिंगसाठी अधिकची रक्कम लागत असल्याचे सांगत सुमारे 68 लाख रुपये फोन-पे व आरटीजीएसद्वारे घेत फसवणूक केली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT