Pune News | भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी यांचे निधन

वैकुंठ स्मशानभूमीत शनिवारी दुपारी करण्यात आले अंत्‍यसंस्कार
डॉ. बी. डी. कुलकर्णी
डॉ. बी. डी. कुलकर्णी
Published on
Updated on

पुणेः भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष, डॉ.भगवंत देवीदास कुलकर्णी (वय ७६ ) शुक्रवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले.वैकुंठ स्मशानभूमीत शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

ते मुळचे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शहादा चे रहिवासी होते. त्यांनी अहिल्यानगर येथील 'ब्रिटिश राज्याचा स्थापना व कारभार' या विषयावर पीएचडी केली. शिरूर येथे बोरा महाविद्यालयात तीस वर्षे प्राध्यापक, दोन वर्षे प्राचार्य, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा महाविद्यालयातही प्राचार्य म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अधिष्ठाता म्हणून कार्य करीत होते. अनेक वर्षे ते अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र इतिहास परिषदेमध्ये कार्यरत होते. गत दहा वर्षे ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनी वृत्तपत्र, संशोधन पत्रिकांमध्ये इतिहासावर विपुल लेखन केले आहे. त्‍यांचा अहिल्यानगर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर हेनरी पोटींजर यांच्या कार्यपद्धतीवर लिहलेला अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news