Maharashtra Temperature: राज्याचे तापमान ३ ते ५ अंशांनी वाढणार

हवामान विभागाची माहिती : अकोला, पुणे ४० अंशांवर
Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होताच उष्णतेचा जोर वाढू लागला आहे. येत्या आठवड्यात कमाल तापमानात सुमारे ३ ते ५ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी अकोला आणि पुणे (लोहगाव) येथे तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उकाड्याची तीव्रता जाणवली.

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांत उष्ण व दमट हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे अंगाला झोंबणारी उष्णता वाढली असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील काही दिवसांत ही परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शनिवारी नोंदलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस):
अकोला ४०.१, पुणे (लोहगाव) ४०, सोलापूर ४०, परभणी ३९, वर्धा ३९, अमरावती ३९.३, जळगाव ३८.८, यवतमाळ ३८.८, सांगली ३८.३, ब्रह्मपुरी ३८.६, चंद्रपूर ३८.४, छत्रपती संभाजीनगर ३७.९, मालेगाव ३७.६, बीड ३७.५, बुलढाणा ३७.५, सातारा ३७.१, धाराशिव ३७.२, नागपूर ३७.४, कोल्हापूर ३६.९, गोंदिया ३६.९, नाशिक ३६.३, महाबळेश्वर ३२.७, मुंबई ३३, रत्नागिरी ३३.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news