Assault Pudhari
पुणे

Baramati Police Custody Case: बारामतीत कोठडीत आरोपीची आत्महत्या; POCSO प्रकरणाने खळबळ

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मध्यरात्री घटना; तपासासाठी वरिष्ठ अधिकारी दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: नात्यातील मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रवींद्र आनंदराव गार्डी (वय ४८, रा. वडगाव निंबाळकर) या आरोपीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कारागृहातच आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार घडला.

नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर गार्डी याने वारंवार शारीरिक अत्याचार केला होता. यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर फलटणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिला नेत त्याने तिचा गर्भपात करून घेतला होता. ही बाब पीडीतेच्या नातेवाईकांना समजतात त्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांनी या प्रकरणी शारीरिक अत्याचारसह पोकसो अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपी पोलीस कोठडीत असताना मध्यरात्री त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT