Purandar Airport Compensation: पुरंदर विमानतळासाठी मोबदला वाटप ठरलं; ६ हजार कोटींची तरतूद

गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम; जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on
Updated on

दिगंबर दराडे

पुणे: प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याबाबतचे पॅकेज अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या गुरुवारपासून शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य शासनाने यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, संबंधित यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेली आहे.

Purandar Airport Project
Pune Temperature 43 Degree Heatwave: पुण्यात पारा 43 अंशांवर; दिवसासह रात्रीही उकाड्याचा तडाखा

पुरंदर विमानतळासाठी देण्यात येणारा एकरी दर जिल्हाधिकारी दोन दिवसात जाहीर करणार आहेत. पुरंदर तालुक्यातील सुमारे सात गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात बहुतांश शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली असली, तरी मोबदल्याच्या दरावरून काही ठिकाणी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. यामुळे पॅकेज निश्चित करण्यास विलंब झाला होता.

Purandar Airport Project
Pune Swargate Bus Stop Issues: स्वारगेटमध्ये बसअभावी प्रवाशांचे हाल; उन्हात ताटकळत उभे

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निधी वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत असून, प्रत्यक्ष वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निधी मिळताच मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Purandar Airport Project
PMPML Bus SOP: पीएमपीची कडक कारवाईची तयारी; खासगी बस कंत्राटदारांसाठी नवी SOP

दरम्यान, काही अहवालांनुसार मोबदला दर निश्चिती आणि निधी वितरणात झालेल्या विलंबामुळे जमीन संपादनाची मुदत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे १,२०० हेक्टरहून अधिक जमिनीचे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.

Purandar Airport Project
Purandar Airport Project: पुरंदर विमानतळाला मोठी चालना; ₹6,000 कोटी कर्जाला राज्य सरकारची हमी

पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, आयटी, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे राज्यभरातून लक्ष लागले असून, आता प्रत्यक्ष मोबदला वाटप सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news