Congress Pudhari
पुणे

Baramati By Election Congress: बारामती पोटनिवडणूक; राष्ट्रवादी न लढल्यास काँग्रेस मैदानात

जिल्हा काँग्रेसची तयारी पूर्ण; महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाने ही जागा लढवली नाही, तर वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार काँग््रेास पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल, असा निर्णय पुणे जिल्हा काँग््रेास कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

काँग््रेास भवन येथे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी बारामती विधानसभेच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

काँग््रेास नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाने या जागेवर दावा केला नाही, तर काँग््रेास निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यांच्या भूमिकेला जिल्हा काँग््रेासने पाठिंबा दर्शविला आहे.

‌‘कोल्हापूर उत्तर‌’च्या पोटनिवडणुकीत भाजपने काँग््रेासविरुद्ध उमेदवार उभा केला होता, याकडे लक्ष वेधत जिल्हा कमिटीने ‌‘महाविकास आघाडीचा धर्म‌’ पाळून ही जागा लढविण्याची तयारी दर्शविली आहे. बारामती विधानसभेची जागा लढविण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग््रेास कमिटीकडे पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात असल्याचे श्रीरंग चव्हाण-पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला काँग््रेासचे ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, कमलाकर सातव, गोविंद मिरघे, आकाश मोरे, रोहित बनकर, डॉ. विजय भिसे, राजेंद्र गायकवाड, धवल गाडे, रमेश जगदाळे यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास बारामती विधानसभेची जागा काँग््रेास पक्ष लढविण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही आमची तयारी आणि प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठणार आहोत.
श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा काँग््रेास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT