Crime Against Women Pudhari
पुणे

Baner Election Assault Case: प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याने बाणेरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

निवडणूक वादातून हिंसाचार; पाच जणांविरुद्ध बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहण केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर ) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण, परवेज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.15) दुपारी साडेतीन वाजता सत्व हॉटेलच्या गेटजवळ घडली आहे.

कल्याणी धनकुडे यांची नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवित आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे निम्हण कुटुंबीय चिडले होते. गुरुवारी (१५ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्या बाहेर आले. त्यांनी सुरुवातीला धनकुडे यांचा मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे याला लाठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत फासगे जखमी झाला.

त्यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचविण्यासाठी आलेले नवनाथ देशमुख यांना देखील मारहाण केली. कल्याणी यांची नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे अलका सरग करत आहेत.

निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो

आरोपी प्रणित निम्हण याने 'निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो', अशी धमकी दिल्याचे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांच्या फिर्यादीनंतर गुरुवारी रात्री उशिरा गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT