पुणे

पुणे : एटीएम मशिन टेम्परिंग करून गंडा घालणारे जेरबंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एटीएम मशिन टेम्परिंग करून नागरिकांना आर्थिक गंडा घालणार्‍या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड, मोबाईल आणि टेम्परिंग करण्यासाठी वापरलेली पट्टी असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनी एटीएम मशीन टेम्परिंग करून पैसे काढले आहेत. धमेंन्द्र श्रीशिवलाल सरोज (वय 30), सोनूकुमार जगदेव सरोज (वय 28, दोघे रा. उत्तर प्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात अशाप्रकारे एटीएम मशीनमधून पैसे काढल्याच्या घटना घडत होत्या. मशीनमधून ज्या ठिकाणाहून पैसे निघतात तेथे हे चोरटे पट्टी लावत होते. ग्राहकांना पैसे खात्यातून कट झाल्याचा मेसेज येत होता.

मात्र, पैसे मशीनमध्ये अडकले असे वाटत होते. मात्र, या दोघांनी ही नामी शक्कल लढवली होती. ग्राहक एटीएम सेंटरमधून निघून गेल्यानंतर हे दोघे ते पैसे काढून घेत होते. भारती विद्यापीठ परिसरातील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. दरम्यान, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारचा एक गुन्हा घडला आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT