Teacher Pudhari
पुणे

Ashram School Teacher Posting: आश्रमशाळांतील शिक्षक पदस्थापनेत मोठा बदल; विद्यार्थ्यांची संख्या अन् विषयांची गरज पाहून नियुक्ती

पवित्र पोर्टलवरील शिफारसप्राप्त शिक्षकांना समुपदेशनाऐवजी गरजेनुसार पदस्थापना; रिक्त पदांचे समप्रमाणात नियोजन करण्याचे शासनाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीमध्ये शिफारस झालेल्या पात्र उमेदवारांना आश्रमशाळांमध्ये पदस्थापना देताना विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि विषयांची गरज विचारात घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे शिफारसप्राप्त नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाच्या माध्यमातून पदस्थापना न देता आश्रमशाळांमधील रिक्त पदांचे समप्रमाणात नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती कार्यासन अधिकारी अजय साखरे यांनी दिली.

पदस्थापनेचे नियोजन करा

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आश्रमशाळेत कोणत्या विषयाची किती पदे भरावयाची आहेत, याची प्रथम निश्चिती करावी. त्यानंतर संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध शिक्षकांची स्थिती लक्षात घेऊन पदस्थापनेचे नियोजन करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

आश्रमशाळांमध्ये सर्व विषयांसाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रिक्त पदे काही मोजक्या शाळांमध्ये केंद्रित न राहता गरजेनुसार समप्रमाणात भरली जातील, यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षक पदस्थापनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश देखील देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT