पुणे

Pimpri News : अतिरिक्त आयुक्तपदी जगताप यांची नियुक्ती कायम

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर उल्हास जगताप यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (क्रमांक तीन) हे पद महापालिका आस्थापनेवरील अधिकार्यांसाठी आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्या पदावर शासनाकडून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्त करता येणार आहे.

या नियुक्तीस नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी गुरूवारी (दि. 21) मान्यता दिली. महापालिकेच्या नवीन आकृतीबंधात अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे निर्माण झाली आहेत. त्याला राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 30 ऑगस्ट 2019 ला मान्यता दिली आहे. प्रदीप जांभळे व विजयकुमार खोराटे हे अनुक्रमे क्रमांक एक व दोनचे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांची शासनाने प्रतिनियुक्तीवर महापालिकेत नियुक्ती केली आहे. तर, अतिरिक्त आयुक्त (क्रमांक तीन) हे उल्हास जगताप आहेत.

ते नगरसचिव देखील आहेत. तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला होता. दरम्यान, त्या पदावर शासनाचा अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू होत्या. तथापि, जगताप यांना कायम करावे, अशी शिफारस महापालिकेच्या निवड समितीने आयुक्त शेखर सिंह यांना केली. तसा, प्रस्ताव आयुक्तांनी नगरविकास विभागाकडे 2 मे 2023 ला मंजुरीसाठी पाठविला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT