पुणे

पुणे : सहा महिन्यांत 9 हजार कुत्र्यांना रेबीजविरोधी लस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीजमुळे जगभरात होणार्‍या मृत्यूंपैकी 36 टक्के मृत्यू भारतात होतात. यापैकी 95 टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते. यामुळे शहरात जास्तीत जास्त कुत्र्यांचे रेबीजविरोधी लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. यावर्षी सहा महिन्यांत सुमारे 9 हजार कुत्र्यांना ही लस देण्यात आली.

दर वर्षी 6 जुलै हा दिवस जागतिक प्राणिजन्य रोग दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1885 मध्ये लुई पाश्चरने रेबीज विषाणूविरुध्द यशस्वीरीत्या लस तयार केली. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कुत्र्यांमध्ये रेबीजची लागण झाली असेल तर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यासाठी कुत्र्यांना दर वर्षी रेबीजविरोधी लसीचे दोन डोस दिले जातात. त्यानंतर दर वर्षी एक डोस दिला जातो. माणसाला कुत्रा चावल्यावर होणार्‍या जखमेवर उपचारांची दिशा ठरवली जाते. किरकोळ दुखापतीसाठी अँटिरेबीज लस अर्थात एआरव्ही 24 ते 28 तासांच्या आत देणे आवश्यक असते.

लसीकरण आकडेवारी
वर्ष लसीकरण 14,137
2021-22 13,148
2022-23 31,133
2023-24 8992 (आतापर्यंत)

महापालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या सर्व संस्थांना कुत्र्यांचे नियमित लसीकरण करण्याच्या आणि नोंदी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जागतिक प्राणिजन्य रोग दिनानिमित्त विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

– डॉ. सारिका फुंदे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT