पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक सत्र तसेच परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून, यंदा 15 जुलैपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सेमीस्टर पॅटर्न अभ्यासक्रमामध्ये पहिले सेमीस्टर 12 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येईल. 18 ते 20 सप्टेंबरदरम्यान प्रथम चाचणी परीक्षा आणि 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान दुसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दुसरे, चौथे आणि सहाव्या सेमीस्टरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 18 डिसेंबर 2024 ते 4 एप्रिल 2025 पर्यंत घेण्यात येणार आहे. 3 ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथम चाचणी परीक्षा आणि 24 ते 26 मार्च 2025 दरम्यान दुसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तिसर्या आणि पाचव्या सेमीस्टरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 15 जुलै ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे. 28 ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान प्रथम चाचणी परीक्षा आणि 16 ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान दुसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. वार्षिक पॅटर्न अभ्यासक्रमामध्ये पहिले वर्ष 12 ऑगस्ट ते 4 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे. 6 ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान पहिली चाचणी परीक्षा तर 24 ते 26 मार्च 2025 दरम्यान दुसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. दुसर्या आणि तिसर्या वर्षाचे शैक्षणिक सत्र 15 जुलै 2024 ते 4 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे.
21 ते 23 ऑक्टोबर 2024 दरम्यान, पहिली चाचणी परीक्षा तर 24 ते 26 मार्च 2025 दरम्यान दुसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. फार्मसीचे प्रथम वर्ष 12 ऑगस्ट ते 4 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे. 4 ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान पहिली चाचणी परीक्षा तर 6 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान दुसरी तर 24 ते 28 मार्च 2025 दरम्यान तिसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. फार्मसीचे द्वितीय वर्ष 15 जुलै ते 4 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे. 21 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान पहिली चाचणी परीक्षा तर 6 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान दुसरी तर 24 ते 28 मार्च 2025 दरम्यान तिसरी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासह राज्य तंत्रशिक्षण मंडळाने हिवाळी सत्राच्या परीक्षा आणि निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, अधिक माहितीसाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा