Pune Anandi Sansar Museum Pudhari
पुणे

Pune Anandi Sansar Museum: कसबा पेठेतील तांबट आळीतील ‌‘आनंदी संसार‌’ भांड्यांचे अनोखे संग्राहालय जपते पुण्याचा पारंपरिक वारसा

गिरीश पोटफोडे यांनी उभारलेल्या या दुर्मीळ संग्रहालयात 800 हून अधिक तांबे-पितळेच्या वस्तूंमधून भारतीय घरगुती संस्कृतीचे जिवंत दर्शन घडते

पुढारी वृत्तसेवा

नितीन पवार

कसबा पेठ: तांबे अन्‌‍ पितळेची भांडी घडवणारी बाजारपेठ म्हणून पुण्याच्या इतिहासात कसबा पेठेतील तांबट आळीची ओळख आहे. ही ओळख नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी व हा वारसा जतन करण्यासाठी येथील गिरीश पोटफोडे यांनी ‌’आनंदी संसार‌’ नावाने उभारलेले भांड्यांचे संग््राहालय हे भारतीय घरगुती संस्कृतीचे दर्शन घडवत आहे.

या संग््राहालयात तांब्यांची अन्‌‍ पितळेची लहान-मोठी जवळपास 800 भांडी समाविष्ट आहेत. सोमवारी (दि. 18) साजऱ्या होत असलेल्या जागतिक संग््राहालय दिनानिमित्त ‌’आनंदी संसार‌’चा घेतलेला हा आढावा.

कसबा पेठेतील गिरीश पोटफोडे टाटा मोटर्स कंपनीत कामाला होते. निवृत्त झाल्यावर तांबट आळीतील वस्तूंची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्वष्टा कासार मंडळाच्या 125 वर्षांच्या निमित्ताने सन 2018 मध्ये येथे तांब्याच्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. त्यातूनच हे प्रदर्शन (संग््राहालय) कायमस्वरूपी असावे, हे लक्षात घेऊन गिरीश पोटफोटे यांनी ‌’आनंदी संसार‌’ हे संग््राहालय उभारले. त्याविषयी सांगताना पोटफोडे म्हणाले की, कसबा पेठेतील तांबट आळी येथील यशोदत्त हौसिंग सोसायटीमधील आनंदी संसारात असलेल्या जुन्या भांड्यांचा अनमोल खजिना माझी आजी आनंदीबाई हिचा आहे.

तिच्या नावावरूनच या संग््राहालयाला ‌’आनंदी संसार‌’ असे नाव दिले आहे. परंतु, जुनी भांडी गोळा करणे सोपे नव्हते. माझ्या आजीच्या काळातील काही जुनी भांडी घरातच होती व इतर वस्तू परिसरातील ओळखीच्या लोकांपासून ते अगदी जुन्या बाजारातील एक-एक वस्तू गोळा केल्या. या संग््राहालयासाठी मी आणि माझी पत्नी गिरिजा जवळपास 15 वर्षे जुनी भांडी गोळा करीत होतो, त्यासाठी आम्ही 2 लाख रुपयांची पदरमोडही केली. समाजातील अनेकांची मदतही झाली. त्यातूनच उभे राहिलेले संग््राहालय 26 मे 2021 रोजी खुले झाले. या अनमोल खजिना नागरिकांना आजतागायत विनामूल्य पाहता येतो.

संग््राहालयातील वैशिष्ट्‌‍यपूर्ण संग््राह

10 बाय 10 च्या पारंपरिक खोलीत जुने स्वयंपाकघर, ओटा, लाकडी माळा, पाण्याचा बंब, घागरी, हंडे, कळशी, दिवे, देवपूजेचे साहित्य, दगडी जातं, पाट-वरवंटा, उखळ, चूल, भातुकली, देश-विदेशातील किचन साहित्य व दुर्मीळ ॲंटीक वस्तूंचा समावेश आहे.

तांबट संस्कृती काय आहे? तांबा, बंब, पेले, जुन्या गोष्टी लोकांना कळाव्या, शस्त्र, तलवारी, मुठी, कट्यार, त्रिशूल, बलुतेदारीबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी हे संग््राहालय उभारले आहे.
गिरीश पोटफोडे, आनंदी संसार, कसबा पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT