Pune Private Hospital: इन्शुरन्स क्लेम मंजूर न झाल्याने खासगी रुग्णालयाकडून मृतदेह देण्यास नकार; पुण्यात संतापाची लाट

13 तासांच्या उपचारासाठी सव्वातीन लाखांचे बिल; नातेवाईकांचा आरोप, प्रशासनावर मनमानीचे गंभीर प्रश्न
Private Hospital
Private HospitalPudhari
Published on
Updated on

पुणे: वडिलांनतर घरातील एकुलता एक कमावता मुलगा गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या डोंगराखाली दबले असतानाच, खासगी रुग्णालयाने इन्शुरन्स क्लेम मंजूर झाला नाही, असे सांगत मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादाबाबत रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Private Hospital
Pune NCP Crisis: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली

रुग्णालयाच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी प्रशासनाला जाब विचारत रुग्णालयातच तीव संताप व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेमुळे खासगी रुग्णालय आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय मनमानी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Private Hospital
Pune Construction Waste: पुण्यात बांधकाम राडारोड्याचा गंभीर प्रश्न उघड

याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक नगरसेवक सुहास टिंगरे म्हणाले की, धानोरी येथील मुंजाबावस्तीत राहणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणाला उपचारासाठी सकाळी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने रात्री 11 च्या सुमारास उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.

Private Hospital
Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात टोमॅटो, आले, काकडीच्या दरात वाढ; पालेभाज्याही महागल्या

तरुणाच्या मृत्यूच्या धक्क्यातून नातेवाईक सावरत नाहीत तोच रुग्णालयाकडून बिलांचा खेळ सुरू झाला. अवघ्या 13 तासांच्या उपचारासाठी रुग्णालयाने तब्बल सव्वातीन लाख रुपयांचे बिल नातेवाईकांच्या हातावर टिकवले. मृत तरुणाचे विमा (इन्शुरन्स) संरक्षण असल्यामुळे नातेवाइकांनी तत्काळ क्लेमची प्रक्रिया सुरू केली. मात्र, विमा क्लेममध्ये काही तांत्रिक त्रुटी निघाल्यामुळे त्या दूर करण्याचे काम रुग्णालयाकडून सुरू होते. विमा मंजुरीच्या या प्रक्रियेत संपूर्ण रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला तरी रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. ही बाब समजताच नगरसेवक सुहास टिंगरे यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Private Hospital
Pune Fruit Market: पुण्यात हापूस आंब्याला मोठी मागणी; डाळिंबाच्या दरात वाढ, कलिंगड स्वस्त

'विमा क्लेम पूर्ण पास झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही,‌’ अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यावर टिंगरे यांनी प्रशासनाला जाब विचारला असता, रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सुहास टिंगरे आणि नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादाबाबत रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news