पुणे

भिगवण : उजनीतील मच्छिमारांमध्ये धार्मिक सलोख्याचे वातावरण

अमृता चौगुले

भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उजनी, खाणार्‍यांना मासे देतेय, शेतकर्‍यांना पाणी देतेय, मच्छिमारांना रोजगार देतेय, त्यामुळे उजनी विविध फायदे देणारे पाणलोट क्षेत्र आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात व राज्यात दंगलसदृश्य वातावरण असताना उजनीतील मच्छिमारांमध्ये असणारे धार्मिक सलोख्याचे आणि एकोप्याचे वातावरण माणुसकी धर्माचे असल्याचे मत भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी व्यक्त केले.

सहा महिन्यांपूर्वी रामोशी समाजाच्या गरीब मच्छिमाराची चोरीस गेलेली होडी टाकळीच्या मच्छिमारांना 30 फूट खोल पाण्यात सापडली. त्या 11 प्रामाणिक मच्छिमारांचा सत्कार दिलीप पवार, पत्रकार भरत मल्लाव, मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोई, राहुल नगरे, नीलेश चमरे, बिट्टू भोसले, छगन वाळके, बालाजी दरदरे आदींच्या हस्ते करण्यात आला.

पवार म्हणाले की, उजनीचे विविध फायदे असले, तरी हे गुन्हेगारांना अभय देणारेदेखील ठिकाण असून, हे मोडीत काढण्यासाठी मच्छिमारांची फार गरज आहे. काहीजण पोलिसांचा त्रास होतो म्हणून माहिती देत नाहीत, पण आपणही साध्या वेशातील पोलिस आहेत याचा विसर पडू देऊ नका. मच्छिमारांना जसा पाण्याचा अंदाज असतो तसा पोलिसांना नसतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, डाळज येथील संतोष भंडलकर यांची सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली होडी टाकळी येथील वडापच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍या युवकांना पाण्यात बुडालेल्या स्थितीत मिळून आली व मूळ होडी मालकाचा तपास लावून ती परत देण्यात आल्याने दिगंबर इरचे, आकाश नगरे, अनिकेत नगरे, लाला शेख, पका शेख, मोहंम्मद शेख, करण कुचेकर, रमजान पठाण, असिफ शेख, रिहान पठाण, ऋषी काकडे व रोहन गुळवे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT