माहेरी पाठविण्यावरून पत्नीसह दोन मेहुण्यांची हत्या | पुढारी

माहेरी पाठविण्यावरून पत्नीसह दोन मेहुण्यांची हत्या

हिसार; वृत्तसंस्था :  पत्नीला माहेरी जायचे होते, पतीने विरोध केला. पत्नीने मग तिच्या दोन्ही भावांना बोलावून घेतले. तिघे मिळून वाद घालू लागले. हमरीतुमरीवर गोष्ट आली आणि त्याने संतापाच्या भरात रिव्हॉल्व्हर ताणली. पत्नीसह दोन्ही मेहुण्यांना गोळ्या घातल्या.

हरियाणातील हिसारच्या कृष्णानगरमध्ये रविवारी सकाळी हे तिहेरी हत्याकांड झाले. सुमन, मनजित सिंग, मुकेश कुमार अशी मृत भावंडांची नावे आहेत. आरोपीचे नाव राकेश पंडित आहे. तो प्रॉपर्टी डीलर आहे. हत्याकांड घडविल्यानंतर आपल्या तिन्ही मुलांसह तो पळून गेला. पोलिसांना घटनास्थळी सात काडतुसे सापडली आहेत.

Back to top button