Ambegaon Well Drowning Incident Pudhari
पुणे

Ambegaon Well Drowning Incident: विहिरीत बुडून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

गोहे बुद्रुकमधील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील करवंदेदरा परिसरात बुधवारी (दि. 3) सार्वजनिक विहिरीत बुडून एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. अश्विनी तानाजी वाळकोळी (वय 28), अक्षदा तानाजी वाळकोळी (वय 5) आणि कार्तिक तानाजी वाळकोळी (वय 3) अशी त्यांची नावे आहेत.

घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान करवंदेदरा येथील वाळकोळी वाडीत असलेल्या गावकीच्या विहिरीत ही घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य करण्यात आले. मात्र, तिघांचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची नोंद मंचर ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिवाजी शंकर वाळकोळी यांनी पोलिसांकडे खबर दिली. मृत्यूचे नेमके कारण आणि घटना घडण्यामागील परिस्थितीबाबत पोलिस तपास करीत आहेत, असे घोडेगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT