पुणे: सासरकडील छळामुळे महिलेने आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती, सासू, सासरे, तसेच नणंदेवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सागर चंद्रकांत शेडगे, सासरे चंद्रकांत शेडगे, सासरे चंद्रकांत, (तिघे रा. स्वामीकृपा बिल्डिंग, आंबेगाव पठार, धनकवडी), नणंद सारिका हर्षल वाल्हेकर (वय ३३, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत (दि. 19) ठेवण्याचे आदेश दिले होते.
ज्योती सागर शेडगे यांच्या आत्महत्ये प्रकरणी भाऊ सागर रेणुसे यांनी भ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बहिणीचा आरोपी सागर शेडगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी कोवीडच्या कालावधीत विवाह झाला होता. यावेळी केवळ 50 लोकांमध्येच हा विवाहपार पडला होता. कोवीडमुळे सासरकडच्यांची कोणतीही इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी विवाहानंतर ज्योती यांचा छळ सुरू केला. विवाहात मानपान केला नाही, तसेच हुंड्यात वस्तू दिल्या नाहीत, तु गावंढळ आहेस, स्वयंपाक येत नाही असे टोमणे मारण्यात आले.
पतीने महिलेच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ केला. पती सागर याला दारू पिण्याचे व्यसन होते. यातूनच तिचा छळ वाढला होता. याबाबत ती माहेरी सांगत होती, परंतु, तिला माहेरकडून मन जुळण्यास वेळ लागले असे समजाऊन सांगीतले जात होते. त्रास जास्तच वाढल्याने माहेरचे ज्योती यांना गावी पाबे येथे घेऊन गेले. त्यानंतर भाऊ व आणखी दोन बहीणी यांनी पती सागर शेडगे याला समजावून सांगितले व त्यांना बहिण ज्योती यांना व्यवस्थित नांदविण्याची विनंती केली.
काही दिवस व्यवस्थित नांदविल्यानंत पुन्हा ज्योतीला त्रास सुरू झाला. दरम्यानच्या काळात सागर हा तिला दारू पिण्यास प्रवृत्त करत असल्याचेही तिने माहेरी सांगितले होते. तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचाही संशय तिने माहेरी व्यक्त केला हेता. त्यानंतर वारंवारच्या छळाला कंटाळून ज्योती यांनी १७ जानेवारी रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम तपास करत आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणामध्ये पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चौघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठांच्या मागर्दशनाखाली पुढील तपास सुरू आहे.प्रियंका निकम, पोलिस उपनिरीक्षक (तपास अधिकारी), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे