पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत बार्शी तालुक्यातील सोरडी या गावातील अक्षय काळे यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच अमृता उराडे हिने मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. एमपीएससीमार्फत सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 49 उमेदवारांची निवड करण्यात आली.
एमपीएससीकडून 2022 साली संबंधित पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. यासाठी पूर्व परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये झाली. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा झाली त्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
2017 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. आईवडील तसेच मित्रांचा कायमच पाठिंबा आणि विश्वास होता. राज्यात पहिला आल्याचा आनंद आहेच. यापुढे सुद्धा अभ्यास सुरू ठेवून यापेक्षा चांगल्या पदासाठी तयारी करणार आहे.
– अक्षय काळे (महाराष्ट्रात प्रथम आलेला उमेदवार)
हेही वाचा