कात्रज नवीन बोगद्यात विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

कात्रज नवीन बोगद्यात विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे/कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज नवीन बोगद्यामध्ये शुक्रवारी दुपारी पाच ते सहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने सातार्‍याकडून मुंबईकडे जाणार्‍या लेनमध्ये हा अपघात झाला असून, यात वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. कात्रज नवीन बोगद्यात दुपारी पावणेतीनच्या सुमारास पुढील वाहनाचा वेग कमी झाल्याने मागील वाहनाची धडक बसली.

यात काही वाहनांचे किरकोळ, तर काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे बोगद्यात कोंडी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी दिली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून वाहनचालक व प्रवासी जखमी नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button