Voting Pudhari
पुणे

Ajit Pawar Nagar Parishad Election Reaction: नगरपरिषद निकाल म्हणजे महायुती सरकारच्या कामाची पावती : अजित पवार

इंदापूर, जेजुरी, भोर, फुरसुंगी-उरुळी देवाची मतदारांनी दिली साथ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला एकमेकांच्या विरोधात उभे रहावे लागले. मात्र, आम्ही तारतम्य ठेवून प्रचार केला. महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचे फळ नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निकालाद्वारे मिळाले आहे. जनतेने आम्हाला चांगला कौल दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होती. त्यात इंदापूर, जेजुरी, भोर आणि फुरसुंगी-उरुळी देवाची येथील मतदारांनी साथ दिली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांनी रविवारी बारामती होस्टेलमध्ये घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आम्ही व भाजप वेगवेगळे लढणार आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आम्ही मित्रपक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत, किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले होते परंतु, ते घेतले गेले आहेत. मुंबईत गेल्यावर चर्चा करू. बाहेरचे घेतल्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असतो. कोणी सुरूवात केली तर समोरचाही सुरुवात करतो, असेही पवार म्हणाले. तसेच नगरपरिषदांच्या निकालाचा थोडाफार परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल.

माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण 1995 मधील आहे. तीस वर्षांत ते अनेक पक्षाकडून आमदार झाले. ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यांचे खाते माझ्याकडे आहे. धनंजय मुंडे यांनी त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली हा योगायोग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा अमली पदार्थ प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आमच्या पक्षाचा कोणी असेल तरी पाठीशी घातले जाणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्वावर अजित पवार म्हणाले, आम्ही यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीत होतो, तेव्हा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत होते. तशाच प्रकारे याबाबतही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, त्या-त्या जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना दिले आहे. मतांची विभागणी होऊ दिली नाही तर निवडून येणे सोपे जाते, त्यामुळे ते-ते अध्यक्ष निर्णय घेतील.

बावनकुळेंऐवजी दिल्ली आणि फडणवीसांशी चर्चा

‌‘राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाशी आघाडी केल्यास राष्ट्रवादी काँग््रेासला सत्तेत वाटा मिळणार नाही,‌’ असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करेन, असे पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT