Maharashtra Politics
Sharad Pawar File photo
पुणे

Maharashtra Politics| अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात असतील

पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनांची घोषणा झाली आहे. मात्र, या योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा करत असल्याने भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी केली.

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नाहीत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असले तर काही माहीत नाही, अशी गुगलीही त्यांनी यावेळी टाकली. शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, शासनामार्फत करण्यात येणारी विकासकामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केली जाते.

सध्या शासनावर कर्जाचा डोंगर उभा आहे. योजना व विकासकामांसाठी निधी मिळत नाही. अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुलींना मोफत उच्च शिक्षणाची घोषणा केली जात आहे. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद नसल्याने या योजनांची शाश्वती नाही.

कुठल्या का बहिणींना द्या; पण निधी द्या...

घरातील लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का? असा सवाल पत्रकारांनी केला असता पवारांनी कुठल्या का होईना; पण बहिणींना निधी द्या, असा टोला लगावला.

SCROLL FOR NEXT